२०१४ या वर्षात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर ४१० वेळा,
तर प्रत्यक्ष ताबारेषेवर १५२ वेळा पाकिस्तानकडून
शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. हे प्रमाण गेल्या ११
वर्षांतील सर्वाधिक होते.यापेक्षा सरळ लढाई का करीत
नाही? सीमारेषेवरील गोळीबार हा त्यांच्या निराशेचे
निदर्शक आहे. एकीकडे शांततेचे प्रस्थाव आणि
दुसरीकडे गोळीबार तिसरीकडे घुसखोरी सुरु आहे.
पाककडून होणा-या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत
फक्त निषेध व्यक्त करीत बसलो आहोत.एकीकडे
सीमारेषेवर गोळीबार सुरू करताना दहशतवाद्यांकडून
घुसखोरीचा प्रयत्न केला जातो.तसेच ह्या गोळीबारात
सीमेवर वसलेल्या गावांना लक्ष्य केले जाते.भारत
देशाने शांतता प्रस्थापित करण्याचे खूप प्रयत्न केले
पण त्याचा उपयोग होत नाही. निरपराध नागरिक
मारले जात असतील तर, याचा गांभीर्याने विचार
व्हावयास हवा. गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ
झाल्याची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला
अपशय येत आहे.प्रतिकूल हवामानाचा फायदा घेत
घुसखोरीसाठी पाकच्या नियंत्रणरेषेवर शस्त्रबंदीचे
उल्लंघन करण्याच्या कुरापती कायमच्या बंद
व्हाव्यात.
No comments:
Post a Comment