लालबाग परिसरात दोन गटांतील शाब्दिक
चकमकीमुळे रविवारी सायंकाळनंतर काही
काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी लगेच परिस्थितीचा अंदाज घेत
कारवाईला सुरुवात करीत नियंत्रणात आणली.
मिडियानेही या घटनेला प्रसिध्दी न दिल्यामुळे
पोलिसांना परिस्थिती हाताळण्यास सोपे गेले.
या भागात रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा कडक
बंदोबस्त लावला होता. अफवांवर विश्वास न
ठेवता शांततेचे आवाहन पोलिसांनी केले.
परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आयुक्त
राकेश मारिया व राजकिय नेत्यांनी
घटनास्थळी धाव घेतली होती.या कारवाईला
थोडा उशिर झाला असता तर मोठा प्रक्षोभ
झाला असता.नेहमीच पोलिसदलावर टीका
केली जाते.पण ते कोणत्या दडपणाखाली व
कसल्या परीस्थितीत काम याचा विचार
केला जात नाही. पोलिसांनी एक मोठी
दंगल होता होता रोखली व शांतता प्रस्थापित
केली.
No comments:
Post a Comment