अंधांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने
पाकिस्तानचा पराभव करीत क्रिकेटमधला
वर्ल्ड कप पहिल्यांदाच जिंकण्याचा पराक्रम
केल्याची बातमी वाचली .जर आपल्या अंध
खेळाडूंच्या संघाने वर्ल्ड कप जिंकला नसता
तर जनतेला अंधांचा वर्ल्ड कप झाला तेही
कळले नसते.या अंध खेळाडूंच्या खेळाला
मिडियाने का कमी लेखले आहे? वर्ल्ड कप
स्पर्धेत भारतीय संघात कोणाची वर्णी
लागते या बातमीला मिडिया महत्व देते तर
मग या अंधांच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या
बातमीला महत्व का दिले गेले नाही? सर्व
मिडियाकडून अंधांबद्द्ल हा दुजाभाव का आहे?
अंध खेळाडूंनीही आपल्या खेळाला आपल्या
देशात प्रसिध्दी मिळत नाही याबद्द्ल दु:ख न
करता उकृष्ट खेळ करीत अंधांच्या वर्ल्ड
कपवर नाव कोरण्याची किमया केली आहे.
भारतीय संघातील महान खेळाडूंनी या अंध
खेळाडूंना भेटून त्यांना शाबासकी देऊन त्यांचा
उत्साह वाढवला पाहिजे. मिडियाने जरी लक्ष
महत्व दिले नसले तरी सरकार व क्रिकेट
मडांळाने या सर्व खेळाडूंना मानसनमान देऊन
मोठी बक्षिसे दिली पाहिजेत.
No comments:
Post a Comment