कॅडल मार्च, मिस मॅच,लव्ह फॅक्टर,हॅपी जर्नी,
बदलापूर बॉइज, स्वामी पब्लिक लिमिटेड ह्या
चित्रपटांना तर अॅग्रेसिव्ह, प्रपोजल,मिस्टर आणि
मिसेस, मदर्स डे,सर्किट हाउस व बॉम्बे-१७ अशा
नाटकांना इंग्रजीत नावे देण्याची प्रथा सुरु झाली
आहे.'हरिश्चंद्राची फॅक्टरी','बीपी','टाईमपास', 'यलो',
पोश्टर बॉईज','ए रेनी डे', 'कॅम्पस कट्टा', 'लिमिटेड
माणुसकी', 'नॉट ओन्ली मिसेस राऊत', 'डोंबिवली
फास्ट','रेस्टॉरंट' ही काही आणखी नावे.मराठातील
नावे संपली काय? कलाकृतीना इंग्रजीत नावे
देऊन काय साधले जाते? आपण मराठी
भाषेवर इंग्रजी भाषेचा प्रभाव पडत असल्याबद्द्ल
ओरड का करतो? इंग्रजीचा ध्यास कशासाठी?
निर्मात्यांना मराठीत नाव दिल्याने कमीपण
वाटतो काय? परदेशात हे चित्रपट प्रदर्शित
करण्यासाठी या मराठी चित्रपटाना इंग्रजीत नावे
दिली जातात का? बदलत्या जीवनशैलीची जी
भाषा झाली आहे, त्याचे प्रतिबिंब चित्रपटाच्या
नावातून उमटताना दिसत आहे का?महाराष्ट्रात
प्रदर्शित होणा-या मराठी चित्रपटांना चित्रपटाच्या
कथानकाशी मिळतेजुळते मराठीतच नाव देण्याची
सक्ती केली पाहिजे
No comments:
Post a Comment