जनरिक औषधांची चर्चा मागे पडु नये...
वाढ्त्या आजारासह औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत
आहेत.महाग उपचार अनेकांना परवडत नसल्याने देशात हजारो
गरीब रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. ब्रँडनेम्सवर खर्च
केलेला पैसा औषध कंपन्या रुग्णांकडून वसूल केल्याने ही
औषधे जनरिक औषधांपेक्षा महाग आहेत.जगरिक औषध
स्वस्त असल्याने केरळ,तामिलनाडू व राजस्थानामघ्ये सरकारी
दवाखाने व रुग्णालयांतून जनरिक औषधे मोफत दिली जातात.
मग महाराष्ट्रात का नाही?आपल्या सार्वजनिक आरोग्यसेवेतील
सत्तर टक्के खर्च औषधांवर होतो. ब्रँडनेम्सची महागडी औषधे
वापरल्याने महाराष्टातील सरकारी आरोग्य केंद्रांमघ्ये औषधांचा
दुष्काळ अनेकदा असतो.खरेतर खासगी वैद्यकिय सेवा देणा-या
डाँक़्टरांनीही जनरिक औषध लिहून देण्यावर शासनाच्या
यत्रंणानी दबाव टाकायला हवा.
अमिर खानच्या 'सत्यमेव जयंते'बद्द्ल डाँक्टरांनी वाद सुरु
केला,पण जनरिक औषधांचा मुद्दा त्यामुळे मागे पडला आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारात जनरिक औषधांचा वापर मोठ्या
प्रमाणात होतो मग आपल्या देशातच का ब्रँडनेम्सची औषधे
वापरली जातात?
हे पत्र दि.१८.०६.२०१२ च्या 'लोकसत्ता'या वृतपत्रात प्रसिध्द झाले आहे.

No comments:
Post a Comment