Wednesday, May 30, 2012

                              विरोधकांनी पर्याय सुचवावेत.



         पेट्रोल  दरवाढ झाल्यावर सर्व  विरोधीपक्षांनी विरोध करीत बंदची धोषणा केली   आहे. सरकारविरोधी असंतोष व्यक्त करण्याचे  हे एकमेव साधन विरोधी पक्षांकडे  आहे. बंद  पाळून  राष्ट्रीय  उत्पन्नांचे  कोटावधी  रुपयांचे नुकसान करण्य़ापेक्षा  या दरवाढीला  पर्याय घेऊन  चर्चा  करुन 

हे दरवाढीचे सकंट  दूर करावे. सरकारला त्यांची चुकीची धोरणे दाखवून द्यावीत. ही दरवाढ सामुहिक चर्चेने  कमी व्हावी  असे सामान्य जनतेला वाटते  पण इतर पक्षांना  बंद हवे आहे.ही दरवाढ आता सरकारच्या हाती राहिलेली नाही हे वास्तव विरोधकांनही विरोध दाखवला आहे.मुंबईतल्या पालिकेतील  सत्ताधा-यांनी  सत्तेवर   आल्यापासून    बेस्टची   भाववाढ, पाणीपट्टीत,   वीजदरात   वाढ तर मालमत्ता कर दुप्पट केले  आहे.मग केंद्राच्या   पेट्रोल दरवाढीला यांचा विरोध का?कोणतीही दरवाढ करताना  सत्ताधा-यांनी राजकारण बाजुला ठेवून जनतेला विश्वासात घेऊन दरवाढ करावी.



हे पत्र(दि.३१.०५.२०१२)'महाराष्ट्र टाइम्स'च्या वृतपत्रात प्रसिध्द झाले आहे.

No comments:

Post a Comment