राष्ट्रीयीकृत बँका कागदपत्र, जामीनदार व
तारणपत्र दिल्यानतंरच कर्ज देतात तरमग हजारो कोटी
रुपयांची कर्जे बुडित कशी होतात?या बँका कर्जदाराची कर्ज
परतफेडीची क्षमता न तपासता व कर्जदारांसह संगनमताने
कर्ज वाटत असल्यानेच बुडित कर्जांचा आकडा वाढला आहे.
मुळात कर्जप्रस्ताव मंजूर करतानाच योग्य ती खबरदारी
घेतली जात नाही.बॅंकांच्याकडून ज्या उद्योगासाठी कर्जे
घेतले,त्यासाठी खर्च न वापरता,अन्यत्र गुंतवल्याने बुडित
कर्जे वाढली आहेत. कर्जे बुडविणारे कोणी सर्वसामान्य
कर्जदार नाहीत तर ज्यानी शेकडो आणि हजारो कोटींची
कर्जे घेतली असे बडे कर्जदार आहेत.बँका कर्जांची वसुली
ठेवलेल्या तारणातून का करीत नाही? की तारण न घेता
कर्जाचे वाटप होते का? या वाढत्या बुडीत कर्जाला
कर्जदारापेक्षा बँकांनाचा जबाबदार घरले पाहिजे.
याप्रकरणी हायकोर्टाने हस्तक्षेप कारवाई केली नाहीतर
या बँकाच बुडीत निघतील. तसेच नव्या सत्ताधार्यांनाही
या गंभीर समस्येकडे लक्ष दिले नाहीतर देश आर्थिक
संकटात येउ शकतो.
No comments:
Post a Comment