बीटी बियाणांना विरोध असूनही याच्या वापराबद्दलचा
निर्णयाचे स्वागत करायला शेतकरी तयार आहेत का?
बीटी बियाणांच्या महागड्या लागवडीमुळे विदर्भ व
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक दुर्दशा चालू
आहे.बीटी बियाण्याच्या लागवडीचे विपरीत परिणाम
शेतकरी भोगत आहेत. बीटी बियाणांना अधिक
रासायनिक खते व सिंचनाची आवश्यकता असते.हे
दोन घटक नसतील तर जास्त उत्पादन मिळणार
नाही. बीटी बियाणे वापरल्यामुळे उत्पादित वस्तू
स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक असल्याने काही
देशाने या बियाणांवर बंदी घतलेली आहे. तसेच
बाजारात बोगस बियाणांचे पिक आलेले आहे.
बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दर
वाढवून शेतक-यांना वेठीस घरले जाते.बियाणे
मागणी आणि पुरवठ्यामध्ये शेतकऱ्यांची
कंपन्यांकडून होणारी लूट रोखली पाहिजे.राज्य
सरकारने बीटी बियाण्याऐवजी पर्यायांचा
प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment