आजची तरुणपिढी एमडी या घातक अंमली पदार्थाच्या
आहारी जात जीव गमवत असल्याने समाज त्रस्त झाला
आहे. कॉलेज तरुणांपासून शाळकरी विद्यार्थीही या
एमडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दहशतवाद्यांच्या
संघटना या ड्रग्ज व्यापारात असल्याने हा एक प्रकारचा
दहशतवादी हल्लाच आहे . विद्यार्थींना या व्यसनात
ओढून मग त्यांच्यामार्फत व्यापर करीत आहेत.अमली
पदार्थविरोधी कायद्यात एमडीचा समावेश नसल्याने
त्याचा फायदा घेत शहरात त्याचे ग्राहक बनवण्यात हे
समाजकंटक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
तरुणांच्या आवडत्या व जवळच्या ऑनलाइन आणि चेन
मार्केटिंगच्या माध्यमातूनच एमडी चा व्यापर चालत
असल्याने आपली तरुणाई सहजपणे त्यांच्या
विळख्यात सापडली आहे. त्यांना या व्यसनातून बाहेर
काढणे गरजेचे आहे. नाहीतर तर या विषाचा प्रादुर्भाव
वाढत जाईल.केंद्र सरकारने भविष्यातला धोका ओळखून
एनडीपीएसच्या निर्बंधीत पदार्थांच्या यादीत एमडीचा
समावेश करुन तरुणांचे आयुष्य पोखरणाऱ्या एमडीचे
स्तोत्र शोधून पोलीसांनी कारवाई करावी. ड्रग्जच्या
दुष्परिणांमाची दाहकता समजण्यासाठी कॉलेजांमध्येही
या अंमली पदार्थांविरोधातली मोठी मोहीम उभी करुन
या दहशतवादी हल्ल्याला समोरे गेले पाहिजे.
No comments:
Post a Comment