हुंडा आजही एक ज्वलंत समस्या ठरली आहे.
आपला समाज किती मागासलेला आहे याची
जाणीव होते. साक्षरतेचे प्रमाण वाढुनही हुंडा या
प्रथेविरोधात अजुनही जनमत सकारात्मक का
होत नाही?आजही ७० टक्के तरुणांनी हुंड्याची
प्रथा योग्य असल्याचे म्हटले जाते.उच्च आणि
व्यावसायिक शिक्षणाला हुंड्याचे प्रमाण कमी
करता आले नाही. समाजाला दोष न देता
तरुणांनी हुंड्याविरुध्द लढा देऊन या प्रथेचे
निर्मूलन करावे.हुंडयामुळे कितीतरी जणीची
वैवाहिक आयुष्ये उदध्वस्त झाली आहेत आणि
त्याची परिणीती `हुंडाबळी’ त झाली.`हुंडा देणं’
हा सुध्दा गुन्हा असला तरीही ही प्रथा
खुलेआम सुरु आहे.हुंडयाची अत्यंत वाईट रुढी
भारतीय समाजात खोलवर रुजली आहे. हुंडा
या संकल्पनेतून बाहेर पडण्यासाठी `हुंडा न
घेणा-या’ मुलाशीच लग्न करायचे अशी
प्रत्येक मुलीनी शपथ घेतली तरच हुंडा या
प्रथेला लगाम बसेल.
No comments:
Post a Comment