Friday, January 17, 2014

असुरक्षित रेल्वेप्रवास



     बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसच्या एसी डब्याला लागलेल्या 
आगीत २६ प्रवाशांचा मृत्यू १३ प्रवासी जखमी झाले होते.
काल वांद्रे- डेहराडून एक्स्प्रेसला आग लागून ९ प्रवाशांचा 
मृत्यू  झाला. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागण्याचे 
कारण देऊन व मृतांना आर्थिक मदत देऊन रेल्वे मोकळी 
होते. पण आग कशामुळे लागली याचा खोलवर   जाऊन
शोध  घेतला  जात नाही.या कारणामुळे आगीच्या घटना
वारंवार  घडत आहेत. परवा  मुंबईत  कारशेडमध्ये उभ्या 
असलेल्या डब्याला अचानक आग लागली होती.चालत्या 
गाडीत  आग   लागल्या नतंर  धुरामुळे गुदमरून  नाहक 
प्रवाशी बळी पडतात. आग  लागण्याची  कारणे  शोधली 
पाहिजे. रेल्वेने  डब्यांच्या  डिझाइनमधील  त्रुटींचा शोध 
घेतला  पाहिजे.रेल्वेचे  डबे शक्य तितके आगप्रतिबंधक 
कसे  होतील, हे  पाहावे  लागेल.प्रवाशांची सुरक्षा रेल्वेने 
जपली  पाहिजे.   दुर्गघटनेनतंर   लगेच  मदत मिळाली 
पाहिजे.रेल्वे प्रशासनाने ठोस कारवाई करीत अपघातांचे 
प्रमाण   कमी  केले पाहिजेत.रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेतील 
ढिलाई  जशी     जबाबदार      मानायला   हवी, तशीच 
प्रवाशांमधील   सुरक्षेविषयीची अनास्थाही  दिसून  येते.

No comments:

Post a Comment