देशव्यापी लसीकरण मोहिमेने अवघ्या साडेचार वर्षांत
भारताने पोलिओमुक्त होण्यात यश मिळविल्याने
जागतिक आरोग्य संघटना भारताला पोलिओमुक्त
राष्ट्र म्हणून घोषित करीत आहे.ही ऐतिहासिक घोषणा
आनंददायी आणि त्याबरोबरच अभिमानास्पद अशीच
आहे. पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी सरकारनेआणि
अनेक सामाजिक संस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे
भारत पोलिओमुक्त झाला आहे. देशात व राज्यात
इतर महाभयंकर रोगांच्या उच्चाटन करण्यासाठी
प्रयत्न होताना दिसत नाही. मलेरिया, एड्स, कुष्ठरोग,
कँन्सर, डेंग्यु,लेप्टोस्पायरोसिस,कावि ळ अशा रोगांचा
फैलाव जोरात असल्याने त्यावरील उपचारास मर्यादा
येते आहेत.या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी भरमसाठ
उपाययोजनांचे 'आभासी' चित्र निर्माण केले असले तरी
वास्तवात मात्र शहरातील बहुतांश साथीच्या आजाराचा
प्रादुर्भाव वाढत आहे. खबरदारीच्या उपाय योजनांची
अंमलबजावणीत नेहमीप्रमाणे त्रुटी असल्याने रुग्ण
वाढत आहेत. आजारांना रोखण्यासाठी धडकपणे
उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आजारांची
स्थिती मात्र ‘जैसे थे ’ आहे. ही परीस्तथीती बदलली
पाहिजे. ज्या पद्धतीने पोलिओचे निर्मुलन झाले आहे
तसेच इतर रोगांचेहि व्हावे. पोलिओप्रमाणे इतर
संसर्गजन्य रोगांवरदेखील विजय मिळवणे गरजेचे
आहे.हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी उद्योगसमूह
आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करण्याची गरज
आहे.
No comments:
Post a Comment