Wednesday, December 18, 2013

अत्याचारी महिलांना वचक बसेल.



        कामाच्या  ठिकाणी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही
छळ होतो. मात्र,  जास्त  प्रमाण  स्त्रियांचे आहे.यामध्ये 
शाब्दिक, शारीरिक, मानसिक  आणि लैंगिक  अशा सर्व 
प्रकारच्या     छळांचा     समावेश  होतो.  कार्यालयांतून 
महिलांवर  होणाऱ्या लैंगिक  छळांना प्रतिबंध  घालणारे  
नवे  नियम  अंमलात  येते  आहेत. तसेच अत्याचारांची 
खोटी,  बनावट  तक्रार  करणाऱ्या    महिलेलाही   कठोर 
शिक्षेची  तरतूद  करून   पुरुषांना  आघार मिळाला आहे.
लैंगिक  छळांना  प्रतिबंध   घालणा-या  नव्या नियमाने 
पुरुषांना महिलांशी बोलायला भिती  निर्माण झाली आहे.
पुरुषांना  गृहीत  घरूनच  महिलांचे   सशक्तिकरणाच्या 
नावाखाली नवीन  कायदे  करताना पुरुषांवरील  खोट्या 
आरोपांनी  होणा-या  बदनामीचा  विचार   केला   जावा.
सर्व पुरुष हे अत्याचार करणारे व सर्व स्त्रिया या ते सहन
करणाऱ्या आहेत असे गृहीत धरूनच कायदे केले जातात
हे चुकीचेच होते.पुरुषांवरील लैंगिक अत्याचारांची संख्या 
मोठी आहे.एकाला सशक्त बनवताना दुस-याला अशक्त 
करु नका.काही महिला लैंगिक छळ हे एक शस्त्र म्ह्णुन 
वापर  करतात  त्यांना  या  नियमाने चाप बसेल. नव्या 
नियमाने पीडित पुरुषांनाही न्याय मिळेल व  जाचातून 
सुटका  होईल.  लैंगिक  अत्याचाराचा  गुन्हा    स्त्री  व 
पुरुषांसाठी  सारखा केल्याने पुरुषवर्ग स्वागत  करेल.

No comments:

Post a Comment