कावळ्याला वाचवताना जखमी झालेल्या उमेश पर्वते
या अग्निशमन दलातील जवानानी मृत्यूशी केलेली झुंज
अखेर अपयशी ठरल्याने वाईट वाटले .कावळ्याचा जीव
वाचविताना स्वतःच्या जीवाची पर्वा न केल्याने हा
अपघात घडला व जीव गमवावा लागला. घटनास्थळाची
पूर्ण माहीती न करून घेतल्याने त्या प्रसंगी निर्णय चुकीचे
ठरतात.अग्निशमन दलात आवश्यक उपकरणांचा अभाव
असल्याने असे जीवावर बेतणा-या प्रसंगाना सामोरे जावे
लागते.निष्काळजी किंवा अती आत्मविश्वासाचे परिणाम
जवानांना भोगावे लागतात.अग्निशमन दलाने सुरक्षित
जोखिम स्विकारून एकही जवान न गमवता मोहीमा
फत्ते करणे अपेक्षित आहे. प्रत् येक जवानाने जबाबदारी
ओळखून सुरक्षित योगदान देणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment