देशाच्या जनतेनी भ्रष्टाचाराला कंटाळून बहुमताने
पंतप्रधान मोदींच्या हाती सत्ता दिली तसेच
महाराष्ट्रातील जनतेनी देखील मुख्यमंत्री
फडणवीसांच्या हाती राज्य दिले आहे.फरक इतकाच
की फडणवीसांना बहुमत मिळाले नसल्याने त्यांना
बहुमत सिध्द करावे लागणार आहे.देशाची कामे
प्रथम व नतंर पक्षाची कामे या पंतप्रधान मोदीच्या
कार्यसंस्कृतीप्रमाणे फडणवीसांनी राज्याचा विकास
करावा. राज्याच्या धोरणात्मक पातळीवरदेखील
स्थिरता प्राप्त होण्याची मोठी आशा आणि अपेक्षा या
जनमताच्या कौलातून निर्माण झाली आहे.त्यांनी
दिलेल्या वचनांनुसारच पावले पडल्यास त्यांची
सकारात्मकता अर्थपूर्ण ठरेल. चांगली कामगिरी
करण्याचा प्रयत्न करून जनतेचा विश्वास संपादन
करण्याचे आव्हान स्विकारतील अशी अपेक्षा आहे.
मोदींप्रमाणे राज्याच्या सर्व क्षेत्रांच्या उभारणीत
मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.
राज्यकारभार, कार्यक्षमता आणि कार्यक्रम, योजना
व निर्णयांच्या अंमलबजावणीत त्यांनी कोणतीही
हयगय खपवून घेऊ नये. मुख्यमंत्री फडणवीस
विधायक दृष्टिकोन ठेवून राज्याची प्रगती
करण्याची जबाबदारी हाती घेतली असे अपेक्षित
आहे. थोड्याच काळावधीत अथक कामे करीत
देशातील जनतेचा विश्वास मोदींनी संपादन केला
त्याचप्रमाणे फडणवीस राज्याचा विकास करतील
अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment