Tuesday, November 4, 2014

अल्पमतातील सरकार स्थापन व्हावे.






देशाच्या    राजधानी    दिल्लीत   राष्ट्रपती   राजवटीत 
कारभार दुर    करण्यात केंद्र सरकार यशस्वी होत नाही.
ही सरकारची   नामुष्की आहे.दिल्लीत कोणत्याही एका 
पक्षाला बहुमत   मिळालेलं नाही.त्यामुळे सत्ता स्थापन 
करताना मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे.दिल्लीमध्ये 
कोणत्याही   राजकीय   पक्षाने    सरकार  स्थापनेसाठी 
पुढाकार   घेतला   नाही    तर   निवडणूक घेण्याशिवाय 
पर्याय   राहणार नाही. अल्पमतातील   सरकार स्थापन 
व्हावे नाहीतर पुन्हा पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे 
जाण्याचा   निर्णय  द्द्या .पुन्हा निवडणूक झाली आणि 
कुणालाच   बहुमत   मिळाले   नाही  तर काय करायचे.
त्यामुळे आहे त्या परिस्थितीतूनच मार्ग काढणे  जास्त 
संयुक्तिक आहे.  दिल्लीमध्ये   सरकार स्थापण्यासाठी 
आवश्यक हालचाली   करण्यास  सर्वोच्च न्यायालयाने 
तेथील   नायब    राज्यपाल   यांना मुदत  दिली.यापूर्वी 
राष्ट्रपती   राजवटीत    दूर   करण्याच्या  हालचाली का 
झाल्या  नाहीत?   केंद्र सरकारची इतर  निवडणुकांच्या 
निकालासाठी   थांबले   होते    का?    हरियाणा  आणि 
महाराष्ट्रावर    कब्जा   मिळविणा-या भाजपाला आता 
दिल्लीचे     सिंहासन    खुणावू   लागल्याने   दिल्लीचे 
सरकार स्थापनेसाठी  भाजपा नेतृत्वाने मनसुबे आहेत.

No comments:

Post a Comment