पुन्हा निवडणूक टाळण्यासाठी स्थिर सरकार हवे म्हणत
भाजपला तोंडी पाठिंबा देत राष्ट्रवादी आपली स्थिरता व
सुरक्षा पाहत आहे .पाठिंबा देतानाही अटी आहेत.राष्ट्रवादी
पक्ष सत्तेत असताना केलेल्या कामगिरीमुळे जनतेनी
पक्षाला नाकारले. पण आता पाठिंबा देऊन चौकशापासून
बचाव करण्याचा हा डाव आहे.तसेच तोंडी पाठिंबा देऊनही
काही पदांची मागणीने करीत सत्तेत राहून राष्ट्रवादीतील
नेत्यांचा बचाव करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजप पक्षाने
जनतेनी नाकारलेल्या या पक्षाच्या कुबड्यांवर सत्तेची
स्थापना करु नये. स्थिर सरकारसाठी आता बिनशर्त
बाहेरून पाठिंबा देतील पण पुढे आपल्याला सुरक्षित करुन
घेतील आणि नतंर कश्यावरून अटी टाकणार नाहीत?
राष्ट्रवादीपक्षाने सत्तेत असताना जनहित आणि
राज्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय का नाही घेतले?
तेव्हा योग्य निर्णय घेतले असते तर जनतेनी नाकारले
नसते.भाजप सरकारने कमी अटी टाकणारा,शेवट पर्यत
साथ देणारा व निर्णयांना पूर्ण पाठिंबा देणा-या पक्षाची
साथ घेत राज्यात नव्याने सरकार स्थापन करावे.
No comments:
Post a Comment