कृत्रीम पध्दतीना आळा घाला.
मच्छीमार जास्त मासे मिळण्यासाठी 'बिग कँच'हे केमिकल मोठ्या प्रमाणात समुद्रात पसरवतात.कच्चा आंबा पिकवण्यासाठी त्यावर कार्बाइड किंवा इथेरल केमिकलच्या पावडरचा मारा केला जातो.केळी केमिकलमघ्ये ठेवून पिकवली जातात.द्राक्षांवरची पावडर निघत नाही.बनावट दुध केमिकल तंत्र उपलब्घ आहे.धान्य पिकवताना वापरण्यात येणारी रासायनिक खते मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम करीत आहेत.कोणतीही सरकारी यंत्रणा यावर का कारवाई करीत नाही?जास्त पैसा कमवण्यासाठी मोठे व्यापारी असल्या कृत्रीम पध्दतीचा सरास वापर करीत लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.रोजच्या आहारात सतत केमिकलका मारा होत राहीला तर सामान्यांचे आरोग्य कसे होईल? लठ्ठ्पणा, डायबीटीस,ह्दयरोग,हायपरटेशन,पचनसंख्येच्या तक्रारीसह आदि आरोग्याच्या समश्या वाढत आहेत.आहारातील केमिकलमुळे रोगांशी सामना करु शकणारी प्रतिकारशक्तीच कमी होत आहे. आरोग्य खाते शरीराला हानीकारक असलेल्या पध्दती बंद करु शकणार नाही का?
हे पत्र दि.०३.०५.२०१२ च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वृतपत्रात प्रसिध्द झाले आहे.
No comments:
Post a Comment