पोस्ट खात्याने डबेवाल्यांचे प्रतिकात्मक चित्र विशेष
टपाल पाकिटावर छापून त्याचे प्रकाशन करून डबेवाल्यांच्या
इनामदारी व मेहनतीने करीत असलेल्या अथक कार्याचा
सन्मान केला आहे. जेवणाचे डब्बे पोहचवण्याचे काम
ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य व
गर्दीच्या शहरात ज्या अचूकतेने काम करणा-या या
डब्बेवाल्यांचे कौतुक आहे. डब्ब्यावरच्या चिन्हावरून
जेवण्याच्या डब्ब्याला घरातून घेऊन कार्यालयात योग्य
माणसापर्यत तिनही मौसमात वेळेत पोहचवण्याच्या
डबेवाल्यांच्या कामाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाची नोंद
जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. अतिशय काटेकोर,
वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्या-या कष्टाळू
डब्बेवाल्यांचा सत्कार पोस्टाने केल्याबद्द्ल पोस्टाचे आभार.
पोस्ट खात्याने मुंबईतील काही संस्थाच्या कार्याचा असाच
सन्मान करावा.
No comments:
Post a Comment