अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सैन्यदलाची
मानवंदना स्विकारताना मोकाट कुत्र्याने आपल्या
कडेकोट सुरक्षेचे धिंडवडे काढले. मोकाट कुत्रा हजारो
सुरक्षा जवानांची व सीसीटीव्ही कॅमे-यांची कडेकोट
बंदोबस्ताची सुरक्षा भेदून राष्ट्रपती भवनाच्या
प्रांगणात शिरतो. हेच आपल्या कडक सुरक्षेचे कवच
आहे का? दहशतवाद्यांनी हल्ल्याचा इशारा दिला
असताना जगासमोर आपल्या सुरक्षा यंत्रणेच्या
क्षमतेचे प्रदर्शन घडले.प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख
पाहुण्यांची सुरक्षा ही भारताची जबाबदारी असल्याचे
सांगून ओबामांच्या सुरक्षेची सर्व हमी घेतल्यानतंर
अशी घटना घडतेच कशी? अशा या सुरक्षेच्या
कारणास्तव अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा
यांचा आग्रा दौरा रद्द केला नाही ना? ओबामा
यांच्या दौऱ्यावर भारत एक हजार कोटी रूपये खर्च
करीत असताना अशा काही गोष्टीकडे सुरक्षा
यंत्रणेने दुर्लक्ष केलेले निर्दशनात आले. पण तेच
घातक घडु शकते.परदेशी पाहुण्यांची चोख सुरक्षा
व्यवस्था ठेवल्यास भारतीयांची मान अभिमानाने
उंचावेल.
No comments:
Post a Comment