Saturday, January 25, 2014

आकाड्यांचे ढोंग कशाला?





    चित्रपटाची लोकप्रियता  प्रेक्षकांपर्यत पोहचवण्यासाठी 
हिंदी  प्रमाणे  मराठीतही  कोटींची आकडेवारी जाहीर होऊ 
लागली आहे.मराठी प्रेक्षक चांगला चित्रपट असेल तर तो 
पाहण्यास आर्वजून जातोच तो काय त्या चित्रपटाने किती 
गल्ला केला ते मोजत बसत नाही.’ हाऊसफुल्लचा बोर्ड  ’ 
नाही,   पण   ’  कोटीतले   आकडे ’   हा    चित्रपटाच्या 
लोकप्रियतेचा   नवीन  निकष निर्मात्याने आणला आहे.  
हे आकडे   फ़सवे   असतात हे   सिध्द  होत आहे.तरीही  
निर्माते  या   कोटीच्या आकडेवारीत  का गुंतले  आहेत? 
मराठी प्रेक्षकांनी या फ़सव्या आकडेवारीच्या चित्रपटांकडे 
पाठ फ़िरवली तर नुकसान कोणाचे होणार?या प्रकारामुळे 
 ठराविक निर्मात्यांचे चित्रपट  चालतील  पण  लहान  व  
 नवीन निर्मात्यांसाठी मोठी अडचण  निर्माण  होत आहे .  
 हेच मराठी सिनेमासृष्टीला घातक आहे.हा आकडेवारीला   
 उद्योग  हिंदी चित्रपटाना लखलाभ असो.






ही प्रतिक्रिया दि.  २५.०१.२०१४  रोजी 'महाराष्ट्र टाईम्स'या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:

Post a Comment