Friday, December 27, 2013

खरी कसोटी





              भ्रष्टाचार करणा-या काँग्रेसच्या विरोधात  
निवडणुका लढवून आता त्यांच्याशी हातमिळवणी 
करीत  आम आदमी पक्षाने सत्ता स्तथापन केली 
आहे .आम आदमी पक्षाने सत्तास्थापनेचा निर्णय 
घेऊन सत्तेसाठी आतूर असल्याचे  दाखवून   दिले 
आहे.सत्तेसाठी  यानीही  राजकारण केले.लोकानी 
विश्वास  टाकून  मते  दिली  त्या मतदारांचा यानी
विश्वासघात केला आहे.भ्रष्टाचारांविरूध्द बोलणारे 
आज भ्रष्टाचारां बरोबर आले आहेत.शेवटी सत्तेचा 
लोभ.पाठिंबा देणारे याना  राज्य  कारभार सुरळित 
करून  देतील का?  दिलेली  आश्‍वासने   पूर्णत्वास 
नेण्यासाठी कॉँग्रेसचीच साथ ध्यावी लागणार आहे.
कॉंग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढू  शकणार
का? पु-या सक्षमेतेने राज्याचा  कारभार  करणे  व 
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणेही याना कठीण 
जाईल.सरकार स्थापन न करताही काँग्रेसला सत्ता 
गाजवण्याची संधी आम आदमी पक्षाने दिली आहे.

No comments:

Post a Comment