Sunday, June 5, 2011

फिक्सिंगचा धोका मोठा

जगभरातून 'र्वल्ड कप'च्या बेटिंगवर अमाप पैसा लावला जाईल.बेटिंग खेळात आल्याने मॅच व स्पॉट फिक्सिंगसारख्या घाणेरड्या प्रकारांनी क्रिकेटची प्रतिमा मळली आहे.ज्या देशाचा  संघ या फिक्सिंगला बळी
पडणार  नाही  तो या  स्पधेर्त विजयी होऊ शकतो. तसेच,संघात स्पर्धा जिंकून देणारे खेळाडू असले तरी
त्यातील  काही  फिक्सिंगमध्ये अडकले तर तो संघ सामने जिंकू शकणार नाही. स्पधेर्तील एखादा सामना
फिक्स करून  हरलो  तर तो संघ या स्पधेर्तून बाहेर जाण्याची शक्यता आहेच.खेळताना देशाच्या अभिमानाची
आणि देशबांधवांच्या राष्ट्रीय अस्मितेची आठवण करीत फिक्सिंगपासून दूर राहायला हवे. फिटनेस सांभाळून
गुणवत्तेनुसार खेळ होईल व दडपण न आणता एकत्रित योगदानातून जो संघ खेळेल तो जिंकेल.

No comments:

Post a Comment