Sunday, June 5, 2011

व्यावसायिक दृष्टी हवी.

उत्तराधिकारी औद्योगिक व आथिर्क  निर्णय घेण्यास पात्र  असतोच  असे नाही,  तरीही  उद्योग घरातच राहावा यासाठी  भारतातील अनेक कंपन्यांच्या प्रमुखपदांचा उत्तराधिकारी  घराण्यातलाच असतो.उद्योगसमूहात प्रमुख पदावरून  कुटुंबात   वाद निर्माण झाल्याने व कुटुंबातील सर्वांना खूष करण्यासाठी उद्योगांची विभागणी केल्याने अंतर्गत स्पर्धा सुरू होते.पण  इतर  मोठ्या   उद्योगसमूहांच्या स्पधेर्ला तोंड देण्यासाठी नवी कॉपोर्रेट संस्कृती अवलंबावी लागणार हे.जागतिकीकरणाच्या स्पधेर्त प्रस्थापितांना धक्का लागतोय.उद्योगसमूहांचा अध्यक्ष हा कुटुंबातला असावा या परंपरेचा हट्ट मोठ्या उद्योगसमूहांनी सोडला पाहिजे.उद्योगाची प्रगती व भरभराट करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन असलेला  व   कार्यक्षम  व्यक्ती नेमली पाहिजे.उद्योगांमध्ये उत्तराधिकाऱ्याच्या निवडीबद्दल  सजगता   आली  पाहिजे,  ती  जोपर्यंत  येत  नाही तोपर्यंत  आपली खरी औद्योगिक प्रगती होणार नाही. उद्योगसमूहांची  सूत्रे  कुटुंबाबाहेरच्या  जाणत्या हातामध्ये जाऊन उद्योगाची  उन्नती  होत  असेल  तर   या   नव्या  कॉपोर्रेट  संस्कृतीचे स्वागत आहे.

No comments:

Post a Comment