Wednesday, June 15, 2011

पाकिस्तानची अराजकाकडे वाटचाल

लादेनच्या खातम्यानतंर पाकिस्तानचे हाल बिकट झाले आहेत.त्यानी पोसलेले दहशतवादी फिरल्याने लष्कराच्या तळावर हल्ले,लादेन पाकिस्तानात मिळाल्याने व चीनचा पाठिंबा घेतल्याने अमेरिकेशी संबध बिधडल्याने अमेरिकेचे ड्रोन हल्ले, लादेनची सर्व माहीती अमेरिकेला दिल्याने अल कायदा व तालिबान पाकिस्तान सरकारच्या विरोधात गेल्याने पाकिस्तानची  अराजकाकडे वाटचाल सुरु झाली आहे. पाकिस्तान सरकारची त्यांच्या लष्कराशी व आयएसआय या गुप्तयंत्रणेत मेळ  राहिला नाही.तालिबानचा म्होरक्या 'ओमर' च्या हत्तेचा संतप्त तालिबान बदला घेण्याच्या तयारीत आहे.अण्वस्त्रांवर कब्जा  मिळवण्याचा अमेरिकेचा व तालिबानचा प्रयत्न असल्याने पाकिस्तान सरकारला आपल्या अण्वस्त्र सुरक्षित ठेवण्यास कठीण जात आहे .अण्वस्त्र धोक्यात  असल्याने  पाकिस्तानत    केव्हाही    मोठा संहार    होण्याची शक्यता    निर्माण   झाली आहे.
दुस-यांच्या मदतीवर अवलंबून असलेले पाकिस्तान राष्ट्र आता चीनची मदत घेतल्याने नविन धोका निर्माण झाला आहे. 

हि प्रतिक्रिया ६/६/२०११ रोजी प्रसिध्द झाली आहे.

1 comment:

  1. What u have written is completely true : AA

    ReplyDelete