Tuesday, June 14, 2011

विरोधी पक्षांची कामगिरी अविश्वासनीय

स्पेक्ट्र्म,राष्ट्रकुल,आर्दश अशा ह्या केद्रांतल्या मंत्र्याच्या घोटाळ्यांची मालिका संपत नाही.या प्रकरणात केद्रंसरकारला घारेवर घरण्यास विरोध पक्षांची कोणतीच हालचाल न दिसल्याने त्यांची या घोटाळ्यांना संमती होती असे वाटते. या घोटाळ्यांच्या विरोधात विरोधी पक्षानी कोणताच विरोध न केल्याने समाजसेवक अण्णा हजारे याना लोकपाल  विधेयकाची मागणीसाठी व योगगुरु रामदेवबाबा याना परदेशातील पैसा देशात आणण्यासाठी उपोषणाचे हत्यार हाती घ्यावे लागले.हि आंदोलने कोणत्याही राजकिय पक्षांचे आंदोलन असूनही या उपोषणामागचा उद्देश विशुध्द राष्ट्रहिताचा  असल्याने दोन्ही आंदोलनाला देशभरातून उत्सूर्त प्रतिसाद लाभला.विरोधी पक्ष शांतपणे ही सत्याग्रहे पाहत बसल्याने जनता नाराज असून विरोधी पक्षांवर विश्वास राहिला नाही.सत्ताधा-याने विरोधी पक्षांच्या मुसक्या बांधून ठेवल्यानेच हे भ्रष्टाचार बोकाळले आहेत.पूर्वीचे विरोधी पक्ष आक्रमक व संधर्ष करणारे असायचे.पण आताच्या विरोधी पक्षांची कामगिरि जनतेला दिसत नसल्याने भ्रष्ट सरकारला पून्हा नव्याने राज्याराज्यातून सत्ता मिळत आहे.लोकशाहीला आणखी  प्रगल्भता आणण्यासाठी व देशातील अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कार्यशिल व सरकारच्या कारभारावर करडी नजर ठेवणा-या विरोधी पक्षांची देशाला गरज आहे.

ही प्रतिक्रीया  १३/०६/२०११ रोजी प्रसिध्द झाले आहे.

No comments:

Post a Comment