Thursday, September 22, 2011

जनतेच्या त्रासात संपाची भर नको.


दिड लाख महपालिका कर्मचा-यांना वेतनवाढीच्या मागणीसाठी
कृपया मुबंईकरांना वेठीस घरु नये.मुबंईकर जनता आधीच त्रासलेली
आहे.कितीही पाउस पडला तरी पाणीटंचाई पाचवीला पूजलेली आहे.
स्वच्छतेच्या नावाने तर बोंबच आहे.रस्त्यारस्त्यावर कच-याचे ढिग
पडून असतात.हाँस्पिटल्समघ्ये योग्य उपचार मिळत नसल्याने
डाँक्टरांना मारहाणीचे प्रकार घडतात.चिरीमीरी दिल्याशिवाय पलिका
कर्मचारी कोणतेही काम करीत नाहीत.अशा परिस्थीतीत आता नागरी
सुविधा ठप्प करुन पालिका कर्मचा-यांनी जनतेच्या सहनशिलतेचा
अंत पाहु नये.प्रशासनाशी लढण्यासाठी त्यांनी जनतेला त्रास देण्याचा
मार्ग अवलंबू नये.ही विनंती.


हे पत्र २० सप्टेबंर २०११ रोजी महाराष्ट्र टाईम्स मघ्ये प्रसिध्द झाले आहे.

No comments:

Post a Comment