Monday, June 27, 2011

गाडी रद्द झालेल्याचे एसएमएस कळवा.

     रेल्वे प्रवाशाना रिर्झव्हेशन करताना स्लिपवर नांव,पता,मोबाईल नबंर
व  सही केल्याशिवाय  रेल्वे आपले  तिकिटीचे बुकींग करीत नाही. ह्या सर्व
माहीतीची नोंद रेल्वे त्यांच्या सगणंकात करुन ठेवते.जेव्हा काही कारणास्तव
गाड्या रद्द झाल्यास रेल्वेने त्या गाड्यांसाठी ज्या प्रवाशानी बुकींग केले आहे
त्या प्रवाशाना  एसएमएस  पाठवून  गाडी रद्द झाल्याचे कळवावे.गाडी  रद्द्
झाल्याची  माहीती  अगोदर कळल्यास  प्रवाशाना  पर्यायी  सोयींचा विचार
करण्यास वेळ मिळेल.नाहीतर गाडी पकडण्यास प्लँटफाँर्मवर आल्यावर कळते
की गाडी रद्द आहे. मग  प्रवाशाची खुपच धावपळ होते.प्रवाशांची ही धावपळ
टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी रद्द झाल्याची माहीती एसएमएस
ने प्रवाशाना कळवावे.

No comments:

Post a Comment