कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेक-यांचा
शोध लावण्याचा पोलिसांच्या तपासात कोणतेही
धागेदोरे अजून तरी हाताला लागलेले नाहीत. पोलिस
हतबळ झाल्याने हल्ला करणा-यांची माहिती देणा-यास
पाच लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा झाली.डॉ.नरेंद्र
दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास अठरा महिने पूर्ण
झाले तरीही हल्लेखोर पकडले जात नाहीत.
दाभोलकरांच्या मारेक-यांची माहिती देणा-यास दहा
लाखांचे बक्षिस देण्याची घोषणाही त्यावेळेच्या
मुखमंत्र्यांनी केली होती.बक्षीसाच्या अमिषाने माहिती
देणारा समोर येईल अशी आशा पोलिसांना व सरकारला
वाटत आहे. बक्षीस जाहीर करणे हा सोपा मार्ग
अवलंबविला जात आहे. पोलिसांचा दहशत कमी होत
चालली आहे. पोलिस लपून राहीलेल्या कोणत्याही
खून्याला शोधून काढतातच. पण या सामाजिक
नेत्यांचे मारेकरी का सापडत नाहीत? राजकारण आड
येत नाही ना? पोलिसांनी याचा प्रथम शोध घ्यावा.
No comments:
Post a Comment